
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दि. १९ ते २२ मे दरम्यान सातपूरच्या आयटीआय मैदानावर आयोजित निमा (NIMA) पॉवर एक्झिबिशनच्या जागेचे भूमिपूजन उद्या शनिवार (दि.13) सकाळी १० वाजता संपन्न होत असून त्यानंतर डोम उभारणीच्या कामास वेग येईल, अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjay Bele) आणि एक्झिबिशन कमिटीचेअरमन मिलिंद राजपूत व संयोजन समिती यांनी दिली...
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे,तंत्र शिक्षणच्या कौशल्य विभागाचे सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, व्यवसाय रोजगारचे सहसंचालक रवींद्र मुंडासे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात सव्वादोनशे हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रांजणगावच्या धर्तीवर नाशकातही इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्याचे स्वप्न या प्रदर्शनामुळे साकार होईल,असा विश्वास बेळे यांनी व्यक्त केला. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, हर्षद ब्राम्हणकर, नितीन वागस्कर, शशांक मणेरीकर, प्रवीण वाबळे, किरण वाजे, दिलीप वाघ, कैलास पाटील, गोविंद झा, संदीप भदाणे,
जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी, संजय राठी, हेमंत खोंड, वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे, जितेंद्र आहेर, मनिष रावळ, श्रीकांत पाटील, रवी शामदासानी, एस. के. नायर, सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, सतीश कोठारी, रावसाहेब रकिबे, प्रशांत जोशी, जयदीप राजपूत, मंगेश काठे, व्यंकटेश मूर्ती, परमानंद नेहे, विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, चंद्रशेखर सिंग, किरण लोणे, विश्वजित निकम, वैभव चावक, विश्वास शिंपी, विजय कडवाने आदी प्रयत्नशील आहेत.