पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र इमारतीचे उद्या भूमिपूजन

पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र इमारतीचे उद्या भूमिपूजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) नाशिक उपकेंद्र (Savitribai Phule Pune University-Nashik Sub Center )इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.17) सकाळी 11 वाजता शिवनई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

नाशिक उपकेंद्रासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले असून त्याची निविदाही प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे नाशिकसह अहमदनगर येथील उपकेंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि.13) विशेष पथक नाशिकमध्ये पाठवून जागेची पाहणी केली. तसेच बुधवारी हे पथक पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाले आहे.

आठ वर्षांपासून उपकेंद्राचा लढा

नाशिकमध्ये पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी विविध संघटनांनी 2014 पासून लढा उभारला आहे. उपकेंद्राची जागा निश्चित झाली. पण त्यासमोरील प्रशासकीय अडचणी काही केल्या संपत नव्हत्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी स्वत: पुढाकार घेत हा विषय मार्गी लावला. पण त्याला मुहूर्त लाभत नसल्याने हा लढा अजूनही सुरुच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com