सटाणा । प्रतिनिधी Satana

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी (3 फेब्रुवारी) उपस्थित राहणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोरे यांनी यापूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत 3 फेब्रुवारी रोजी समारंभ होत असल्याचे सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे, माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा.डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे, नगरविकास सचिव महेश पाठक,

नगरपरिषद संचालक किरण कुलकर्णी, पर्यटन विभागाच्या संचालक वल्सा नायर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. धनंजय सावळकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.