देवमामलेदार मार्गाचे भुमीपूजन

देवमामलेदार मार्गाचे भुमीपूजन

मुंजवाड । प्रतिनिधी | Munjwad

शहरातील वाहतूक कोंडी (Traffic jam) दूर करण्यासाठी पुष्पांजली थिएटर ते देवमामलेदार मंदिर (Devmamaledar temple) ते मुंजवाड (Munjwad) या रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर (Funding approved) झाला असून या मार्गाचे ‘श्री देवमामलेदार मार्ग’ म्हणून नामकरण करण्यात येईल, अशी घोषणा आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांनी केली.

तालुक्यातील पठावे दिगर जि.प. गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन (bhumipujan) व लोकार्पण समारंभात (Dedication Ceremony) आ. बोरसे बोलत होते. गोळवाड, जाड, गौतमनगर, चाफापाडा, बोरदैवत, हनुमंतपाडा, जामनेसपाडा, भीमखेत, वाघांबे, साल्हेर, साळवन, पायरपाडा, भिकारसोंडा, महारदर, तताणी, केळझर, भावनगर, करंजखेड आदी गावांमध्ये विविध योजनांमधून मंजूर असलेल्या रस्ते (road), पूल (bridge), काँक्रिटीकरण (Concretization), सभामंडप आदी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ. बोरसे यांच्या हस्ते आले.

याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात विविध योजनांमधून बागलाणच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपयांहून अधिकचा निधी उपलब्ध करून घेण्यात यश मिळाले. आगामी काळात देखील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासोबतच प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी मिळण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न आहे.

साल्हेरचे आठ व मानूरच्या बारा पाड्यांमध्ये देखील आपण यंत्रणेसोबत पाण्याचे श्रोत शोधण्याचे काम काही प्रमाणात केले असून लवकरच अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. साळवन पाणीपुरवठा योजनेसाठी (Water supply scheme) अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून लवकरच या गावाची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंतापूर ते मोसमनदी या दावल मलिकबाबा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकारणासाठी 48 लाख रुपयांच्या निधीला एफडीआरमधून मंजूरी देण्यात आली आहे. तसेच केरसाने ते मुंगसे रस्त्याच्या सुधारणेसाठी 42 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा (Tender) काढून कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही आ. बोरसे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास जि.प. सदस्य गणेश अहिरे, नामपूर कृउबा संचालक मधुकर चौधरी, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देवरे, उपअभियंता संजय मोरे, सहाय्यक अभियंता जयंत पवार, शेखर पाटील, दळवी, सपकाळे, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब सावंत, दीपक देशमुख, नंदू गवळी, राणी भोये आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com