त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्वदरवाजा दर्शन मंडपाचे आज भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्वदरवाजा दर्शन मंडपाचे आज भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

त्र्यंंबकेश्वर मंदिराच्या Trimbakeshwar Temple पूर्वदरवाजा परिसरात नूतन दर्शन मंडपसाठी Darshan Mandap भूमिपूजन आज(दि.15) दसर्‍याच्या मुहूर्तावर सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

पूर्व दरवाजाने मंदिरात जाण्यासाठी भाविकांना प्रतिक्षा करावी लागते. त्यांचे ऊन,वारा आणि पावसापासून रक्षण होण्यासाठी हा मंडप उभारण्यात येणार आहे.

यासाठी दोन कोटी रुपये ट्रस्ट खर्च करणार आहे. भुमीपुजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते, जिल्हा न्यायाधीश व त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.

यावेळी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण उपस्थित राहणार आहे.अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली कार्यक्रम कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Related Stories

No stories found.