बारागाव पिंप्रीत विकासकामांचे भुमिपूजन

बारागाव पिंप्रीत विकासकामांचे भुमिपूजन

पंचाळे । वार्ताहर Panchale - Sinnar

तालुक्यातील बारागाव पिंप्री (Baragaon Pimpri) येथे ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून (Finance Commission) मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे सरपंच संध्या कटके (Sarpanch Sandhya Katke) यांच्या हस्ते भूमिपूजन (bhumipujan) करण्यात आले.

गावातील रस्ते (road) व विविध कामांसाठी कटके यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे (former mla rajabhau vaje) यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार गावातील रस्ते व विविध कामांसाठी भरघोस निधी (fund) उपलब्ध झाला आहे. त्यात भूमीगत गटारी (Underground sewers ), पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीला जाळी बसवणे व विहिरीची दुरुस्ती (Repair of wells), साईबाबा मंदिराला संरक्षक भिंत बांधणे, या मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक (Paver block) बसवणे, इंदिरा नगर परीसरात शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकणे या कामांचा समावेश आहे.

ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत-जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सरपंच कटके यावेळी म्हणाल्या. यावेळी उपसरपंच योगेश गोराडे, सदस्या शिला उगले, विजय कटके, मनीषा उगले, अ‍ॅड. अनिल उगले, अविनाश कळंबे, ग्रामविकास अधिकारी संदीप देवरे, काशिनाथ गोडगे, समाधान गोराडे, वसंत शहाणे, सोमनाथ उगले, शांताराम गोराडे, लखन उगले, सुभाष नागरे, सोमनाथ गोडगे, सुभाष उगले, शरद कटके, सोपान रोडे, अशरफ शेख, विशाल उगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com