भुजबळ, मुंडे आज एका व्यासपीठावर

भुजबळ, मुंडे आज एका व्यासपीठावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे BJP Leader Pankaja Munde व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal आज नाशिकमध्ये एकाच व्यासपिठावर येणार आहे. भाजपच्या मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर हा योग जुळून आणला आहे. राज्याचे दोन वेगवेगळे पक्षाचे पण ओबीसी समाजाचे नेते एकाच ठिकाणी येणार असल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

आज सकाळी 11 वाजता शालिमार येतील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते येणार आहे. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना व अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिकसह राज्यातील सुमारे 18 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ओबीसी नेत्यांच्या भुमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये कंटाळून ज्येष्ठ नेते नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत नवीन इनिंग सुरू केली. यामुळे त्यांच्या अडचणीत एक प्रकारे वाढ झाल्याचे दिसत आहे. नाथाभाऊ गेल्यावर त्यावेळी पंकजा मुंडे देखील शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. तर केंद्राच्या मंत्रीमंडळ विस्तरात प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळणार अशी अशा असतांना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आल्याने पुन्हा चर्चांना उधान आले होते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सिध्द झाले आहे.

तर दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून सतत विविध आरोप होत आहे. आ. सुहास कांदे यांनी जिल्हा नियोजन समिती निधीचा कारण देत अनेक आरोप केले आहे, तर त्यात सेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या नाशिक दौर्‍यात आ. कांदे यांच्याच पाठीवर हात ठेवल्याचे दिसले. यामुळे या दोन्ही ओबीसी नेते एकाच व्यासपिठावर आल्यावर काय बोलणार याची मोठी उत्सूकता लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com