भुजबळ कोविड सेंटर तिसऱ्या लाटेसाठी राहणार सज्ज

३४ रुग्णांवर उपचार सुरु : अद्यापपर्यंत ८५३ रुग्णांवर उपचार
भुजबळ कोविड सेंटर तिसऱ्या लाटेसाठी राहणार सज्ज

नाशिक | Nashik

नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडीयममध्ये मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या भुजबळ कोविड केअर सेंटर मध्ये अद्यापपर्यंत ८५३ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून सद्यस्थितीत ३४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

सद्या जरी करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सहकार्यासाठी भुजबळ कोविड केअर सेंटर सज्ज राहणार असून आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी भुजबळ कोविड केअरची पाहणी करून उपचार घेत असलेल्या रूग्णांची चौकशी केली. तसेच डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, कैलास मुदलियार, डॉ. अभिनंदन जाधव, डॉ.श्वेता आचार्य यांच्यासह डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या भुजबळ कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण ८५३ रूग्णांवर उपचार करण्यात आले असून सद्यस्थितीत ३४ रुग्ण उपचार घेत आहे.

या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी रुग्णांशी आणि डॉक्टरांनी संवाद साधला. तसेच रुग्णसंख्या जरी घटत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मदतीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी तत्पर असणार आहे. त्यादृष्टीने येथील सर्व मेंटेनन्स व इतर सर्व कामे पूर्ण करण्यात यावी व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन करण्यात यावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी रुग्णांची चौकशी करत असतांना येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह टीमचे आभार मानले. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे नियोजन केल्यामुळे त्यांचे कौतुक करत माजी खासदार समीर भुजबळ यांनी सर्व टीमचे आभार मानत तिसऱ्या लाटेतही सज्ज राहून काम करण्याचे आवाहन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com