बोगस आदिवासी झाला 'एमबीबीएस'; काय आहे प्रकार?

बोगस आदिवासी झाला 'एमबीबीएस'; काय आहे प्रकार?
Breaking News

नाशिक | प्रतिनिधी

बोगस आदिवासी प्रमाणपत्र सादर करुन एमबीबीएससाठी प्रवेश मिळविणा़र्‍या भायखळ्याच्या एका डॉक्टर विरुध्द आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे....

याबाबत अधिक माहीती अशी की, गेल्या दहा वर्षांपूर्वी २०११ मध्येे भायखळ्याच्या इसउल्लाह अन्सारी या तरुणाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाला आपण तडवी आदीवासी असल्याचे कागदपत्रे सादर करत एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता.

यानंतर नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यलयातून त्याने शिक्षण पुर्ण केले. संपुर्ण डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्याच एका हितशत्रुने अन्सारी कसा बोगस आदीवासी दाखवत आहे, हे पत्राद्वारे कळविण्यास सुरवात केली.

त्यानंंतर पोलिसांनी सखोल तपास केला. काल भायळ्यातील आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब राऊत यांनी आडगाव पालिस ठाण्यात येऊन अन्सारी विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरक्षक सुभाष जाधव पुढाील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com