इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

भावली धरण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगत करण्याचा मानस

मंत्री जयंत पाटील यांचे प्रतिपादन

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

राज्यासाठी अतिशय पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने ह्या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य भावली आणि वैतरणा धरण परिसरात ना. पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पर्यटकांना आकर्षित करणारे सौंदर्य ह्या भागात असल्याने लवकरच आवश्यक त्या योजना राबवण्यासाठी नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले.

अतिशय निसर्गरम्य वातावरणात भावली धरण वसलेले असून अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी इथे भेट देतात. त्याअनुषंगाने या धरण भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही यानिमित्ताने विकसित होतील. नैसर्गिक धबधब्यांचे चांगले सुशोभीकरणही करता येऊ शकते असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

इगतपुरी तालुक्यातील विविध धरण क्षेत्रात पर्यटनाचा विकास केल्यास तालुक्याचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. त्यासाठी संबंधित मंत्र्याना भेटुन पाठपुरावा केला जाईल. तालुक्यातील पर्यटन क्षेत्र विकसीत झाल्याने येथील स्थानिक युवकांना शाश्वत रोजगारही उपलब्ध होईल.

- हिरामण खोसकर, आमदार

Deshdoot
www.deshdoot.com