इगतपुरी तालुक्यातील भावली धरण अखेर ओव्हरफलो

भावली धरण
भावली धरण

घोटी | Ghoti

पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखेर पावसाने काल जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.

तालुक्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलै अखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.

भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा मुकणे वैतरना, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com