भावेंची जामिनावर मुक्तता

भावेंची जामिनावर मुक्तता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आक्षेपार्ह व आपत्तीजनक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे प्रवक्ता जितेंद्र भावे Aam Aadmi Party spokesperson Jitendra Bhave यांच्यासह दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जितेंद्र भावे यांना अटक करून जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेतील महिला अधिकार्‍याच्या कक्षाबाहेर फेसबुक लाईव्ह Facebook Live करुन आक्षेपार्ह विधान वापरले होते.

शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या तक्रारीनुसार, महापालिकेच्या शिक्षण अधिकार्‍यांसोबत गैरवर्तन करण्याच्या आरोपात पोलिसांनी आपचे प्रवक्ता जितेंद्र भावे यास सरकारवाडा पोलिसांनी गुरुवारी (दि. 23) अटक केली. मात्र, भावे विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर जामिनावर सोडून दिले.

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी चेन्नईमधून आलेल्या काही लोकांना भेटावे आणि एका वर्तमानपत्राचा अंक शिक्षकांमार्फत विकून द्यावा, यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करीत यासाठी नकार दिल्याने संशयित भावे यांनी असभ्य वर्तन केल्याची फिर्याद धनगर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली होती.

या फिर्यादीची दखल घेत संशयित भावे यांना पोलिसांनी अटक करून त्यांची चौकशी केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com