वित्त आयोग निधी नियोजनाला वेळ नाही का?; डॉ. भारती पवारांनी खडसावले

वित्त आयोग निधी नियोजनाला वेळ नाही का?; डॉ. भारती पवारांनी खडसावले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंधराव्या वित्त आयोगाच्या (Fifteenth Finance Commission) निधी नियोजन जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) ग्रामपंचायत विभागाकडून संथगतीने सुरू असल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून केली जात असतानाच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनीही याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे...

राज शासनाच्या विविध योजनांचे नियोजन तात्काळ केले जाते. मात्र, केंद्राकडून प्राप्त झालेल्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन करायला आपल्याकडे वेळ का नाही? अशा शब्दांत डॉ. पवार यांनी संबंधित अधिकारी यांची कानउघाडणी केली.

दरम्यान, या निधीतील कामे ग्रामसेवकांनीच घेतल्याचे डॉ. पवार यांनी निदर्शनास आणून देत अशा ठेकेदार झालेल्या ग्रामसेवकांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.

डॉ. भारती पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) विविध विभागांची बैठक घेत आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.), जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचा यावेळी आढावा घेण्यात आला. यात २५.१२ कोटींचा निधी प्राप्त होऊनही त्यांचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यावर डॉ. पवार संतप्त झाल्या अन् त्यांनी संबंधित अधिकाºयांस विचारणा केली.

केंद्र सरकारकडून (Central Government) आयोगाचा निधी एप्रिल महिन्यात उपलब्ध होऊन देखील नियोजन का झाले नाही? शासनाच्या इतर योजनांच्या निधीचे (Fund) नियोजन लवकर केले जाते. मात्र, केंद्राच्या योजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वित्त आयोगाच्या यापूर्वी झालेल्या नियोजनातही कसा घोळ झाला, हेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामसेवक बनले ठेकेदार

वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांच्या वाटपानंतर ते कोणी घेतले आहे हे माहिती आहे का, असा प्रश्न डॉ. पवार यांनी करत ही कामे ग्रामपंचायतींचे (Grampanchayat) ग्रामसेवकच (Gramsevak) घेत असून, तेच कामे करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामसेवक हे ठेकेदार झाले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यासाठी या निधीतून झालेल्या काम वाटपाचे, तसेच कामे घेतलेल्या ग्रामसेवक ठेकेदारांची चौकशी करण्याचे निर्देश डॉ. पवार यांनी यंत्रणेला दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com