गढूळ पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेचे आंदोलन

गढूळ पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेचे आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) पूर्व विभागात मेनरोडसह संपूर्ण जुने नाशिक भागात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने महापालिकेतील सत्ताधार्‍यांचा निषेध म्हणून आज भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे (Bhartiy Vidyarthi Sena) नाशिक महानगरपालिका मेनरोड कार्यालयात (Mainroad office) आंदोलन करण्यात आले...

गढूळ पाणी बाटल्यांमध्ये भरून त्या बाटल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांचे छायाचित्र लावण्यात आले. फडणवीस मिनिरल वॉटर नाशिककरांच्या आरोग्याशी खेळ हा एकमेव उद्देश! असे स्टीकर लावून महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तसेच प्रभारी विभागीय अधिकारी राजाराम जाधव (Rajaram Jadhav) यांना हा पाण्याचा प्रश्न त्वरित सोडून सर्व नाशिककरांना चांगले व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात केली. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नाही मिळाले तर मनपातील संबंधित अधिकारी वे महापौर यांना शिवसेना (shivsena) स्टाईलने आंदोलन करून धडा शिकवू असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.

आंदोलनात भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, शिवसेना महानगर संघटक योगेश बेलदार, निलेश पाटील, स्वप्नील जाधव, नंदेश ढोले, रितेश साळवे, साहिल मनियार, संजय गोसावी, ओमकार कंगले, युवराज जाधव, अद्वैत जोशी, विजय कुमावत, भरत शेटे, भूषण मोरे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com