भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रभाग २७ मधील घरकुल योजना येथे होणाऱ्या पोलीस चौकीच्या जागेचा ना हरकत दाखल त्वरित पोलीस प्रशासनाला देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार याना भाजपच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि,प्रभाग २७ मधिल वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, भुरटे चोर तसेच औद्योगित वसाहत असल्या कारणाने येथील वातावरण हे मोठ्या प्रमाणावर दहशती खाली आहे.

परिणामी या भागात आमच्या वतीने शासन दरबारी नविन पोलीस ठाण्याची मागणी केली आहे. दरम्यान चुंचाळे येथील घरकुल योजना व दत्तनगर परिसर हा अतिशय दाट वस्तीचा असल्याने येथे गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणास वाढत चालली आहे. परिणामी पोलीस आयुक्तांकडे आम्ही चौकीची मागणी केली असता त्यांनी त्वरीत पोलीस चौक्या मंजुर करून मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिले असले तरी जागेअभावी पोलीस चौकीची अडचण आहे.

दत्तनगर गट नं. ६८ व ६४ मधील व्यायाम शाळेची बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली इमारत व घरकुल योजनेतील पोलिस चौकी तयार असून आपल्याकडून पोलीस आयुक्तांना या जागांविषयी रितसर ना हरकत दाखला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे साहेबराव दातीर,रामदास दातीर,माजी नगरसेवक राकेश दोंदे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com