मटाने येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मटाने येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

वाजगाव l Vajgaon (वार्ताहर)

मटाने (ता. देवळा) येथे महाविद्वन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साध्या पद्धतीने प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन येथील ग्रामपंचायत सदस्य समाधान केदारे व रवी केदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी येथील चिमुकल्या सत्यजित श्रीकांत केदारे (वय 3 वर्ष) भीम सैनिकांने विश्वरत्न, महानायक, अर्थशात्री महान इतिहासकार यांच्या जीवनावर आधारित उपस्थिती नागरिकांना विचार सांगण्याचा प्रयत्न केला.

या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच भाऊसाहेब आहेर, सदस्य समाधान केदारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटिल, रवींद्र केदारे, रवींद्र आहिरे, श्रीकांत केदारे, काकाजी आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी ईश्वर मोरे, पोपट केदारे, सागर पवार, संगणक चालक केदु पगार आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com