Video/Photo : भारत बंदचे पडसाद; ठिकठिकाणी निदर्शने

Video/Photo : भारत बंदचे पडसाद; ठिकठिकाणी निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी

केंद्र सरकारने Central Government गेल्यावर्षी मंजूर केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यांना Three agricultural laws एक वर्ष पूर्ण झाले. दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकरी आंदोलन सुरुच आहे, या कायद्यांना विरोध करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली होती. त्यामुळे भारतबंदचे पडसाद नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पडले.

नाशिक येथील व्हिडीओ

घोटी येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (National Congress Party),मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (marksvadi communist party), शेतकरी कामगार पक्ष (Shetkari Kamgar Paksh) यांच्या वतीने बस स्थानक ते सिन्नर फाटा असा मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व आमदार हिरामण खोसकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ,जेष्ठ नेते जनार्दन माळी,कॉ देविदास आडोळे यांनी केले यावेळी मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे केले त्यामुळे शेतकरी उध्वस्त होणार असून के कायदे रद्द करावे अशी मागणी आमदार खोसकर यांनी केली तर अकरा हजार कोटी इतका मोठा ड्रग्जचा साठा ज्यांच्याकडे सापडला त्या अदानीला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रदेश सचिव गुंजाळ यांनी केला.

घोटी येथे रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती तर नाशकातही कृषी विधेयकाच्या प्रती फाडत निषेध करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, हंसराज वडघुले, राजू देसले यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

घोटी येथील बस स्थानकातून निघालेल्या या मोर्चानंतर रास्ता रोको (Rasta Roko) करून नायब तहसिलदार गेंडाळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष रामदास धांडे, सि आय टू तालुकाध्यक्ष सुनिल मालुंजकर,जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले,बाळासाहेब कुकडे,संदीप गुळवे,गोपाळ लहांगे,कॉ दत्ता राक्षे,भाई संदीप पागेरे,चंदू लाखे,विश्वास दुभाषे,बाळासाहेब वालझाडे,ईश्वर सहाणे,संपत मुसळे,संतोष सोनवणे,निवृत्ती कतोरे, अरुण गायकर,अरुण भोर,सुदाम भोर,सविता पंडित,ज्ञानेश्वर कडू,कमलाकर नाठे,पांडुरंग शिंदे,किरण पागेरे,कैलास घारे,गणेश कौटे,योगेश सुरुडे यांच्यासह असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिरावणी येथील रास्ता रोको

माकपच्या विविध मागण्यांसाठी पेठला रास्ता रोको

पेठ | Peth

शेतकर्याच्या विविध समस्या ,केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण , वाढती महगाई , बेरोजगारी या व विविध मागण्या साठी माकपच्या वतीने जुना बस स्टॅण्ड समोरील चौकात कॉ . देवराम गायकवाड , नामदेव मोहंडकर यांच्या नेतृत्वाखाली जवळ्यास तासभर रास्ता रोको करण्यात आला.

या रास्ता रोको आंदोलनाला शहरातील कॉंग्रेस, आरपीआय पक्षाने पाठींबा दिला होता. मोर्चात माकपचे प्रभाकर गावीत , समीर राजे , जाकीर मनियार , कॉग्रेसचे विशाल जाधव , याकुब शेख , अशोक ताठे आदींसह शंभरावर कार्यकर्ते उपस्थित होते . तासाभराच्या रास्ता रोको नंतर वाहतुक पूर्ववत सुरु करण्यात आली . यावेळी नायब तहसिलदार गावंढे उपस्थित होते .पो. नि . दिवानसिंग वसावे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.