
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जानेवारी महिन्यात होणा-या परभणी (parbhani) ते मुंबई (mumbai) दरम्यान काढण्यात येणाऱ्या धम्म पायी रॅलीच्या (Dhamma rally) मार्गाची थायलंड (Thailand) येथुन आलेल्या भंन्तजी यांच्याकडुन पाहणी करण्यात आली.
थायलंड येथुन आलेल्या भंन्तजीचे कॉंग्रेस (congress) कडुन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात (maharashtra) १५ जानेवारी २०२३ रोजी परभणी येथुन जागतिक स्तरावर धम्म पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली मुंबईला १७ फेब्रुवारी २०२३ ला पोहचणार आहे. ही पायी रॅली ५०० कि.मी अतंर चालणार असुन यात विविध देशांचे लोक सहभागी होणार आहेत. तसेच मुंबईत ४०० किलोच्या धातुच्या मृर्तीची स्थापणा होणार आहे.
यावेळी नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीन (Nashik District Congress Scheduled Caste Division) थायलंड येथुन आलेल्या फ्रासंस्क सॉगस्क, फ्रमाहा साॅगबंध्द, डॉ. वुटीचल ओरिजिंग, सुथिनी चाऊमिट्टी, फिरिमा फुयगंसिरी तसेच त्यांच्या सोबत असलेलेअमोल धावदे यांचा सत्कार व्दारका,
नाशिक येथे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, प्रदेश सरचिटणीस सुरेश मारु, ईशाक कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक शेंडगे, प्रा. प्रकाश खळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजी बर्डे, अमोल मरसाळे, देवेन मारु आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.