भालेराव खून प्रकरणातील संशयिताचा कारागृहात मृत्यू

भालेराव खून प्रकरणातील संशयिताचा कारागृहात मृत्यू

नाशिकरोड | Nashik

नवीन नाशिक (New Nashik) मधील हॉटेल सोनालीमध्ये (Hotel Sonali) किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून नाशिकरोड (Nashikroad) येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अतुल सुभाष पिठेकर (Atul Pithekar) (१९) याचा मध्यवर्ती कारागृहात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला...

स्टेट बँक जवळील सोनाली हॉटेल मध्ये बुधवार (दि.२८ जुलै) रात्री ०९:४५ च्या सुमारास प्रसाद भालेराव (२५, रा. देवळाली गाव, राजवाडा) हे मित्रांसमवेत जेवण करायला गेले होते.

यावेळी अनिल पिठेकर, निलेश दांडेकर (दोघे रा. इंदीरा गांधी वसाहत, लेखानागर) यांच्यासोबत किरकोळ कारणावरून प्रसाद याचे वाद झाले. याचा राग मनात धरून पिटेकर व दांडेकर यांच्यासह चार ते पाच युवकांनी हॉटेल बाहेर शनी मंदिरासमोर प्रसाद ला मारहाण करीत त्याच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केले. त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली होती.

दरम्यान यातील संशयित आरोपी अतुल सुभाष पीठे कर १९ हा सुद्धा मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) खून प्रकरणी अटकेत होता. आज सकाळी अतुल याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर त्याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अबिद अबू अत्तर (Abid Abu Attar) यांनी तपासून पीठेकर यास मयत घोषित केले.

या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस (Nashikroad Police Station) ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com