48 हजार मीटर कापडावर भक्तांबर स्तोत्र

48 काव्यांचे लेखन; महिलावर्गाचा सहभाग
48 हजार मीटर कापडावर भक्तांबर स्तोत्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मांगीतुंगी ( Mangitungi ) येथे आठव्या दिवशी पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या ( Lord Rishabhdev)108 फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक ( Mahamastakabhishek ) झाला. 48 हजार मीटर कापडावर भक्तांम्बर स्तोत्र लेखन सुरू झाले. प्रत्येकी एक मीटर कापडावर चार रंगांमध्ये भक्तांम्बर स्तोत्रातील ( Bhaktambar Strotra) 48 काव्यांचे लेखन केले जात आहे. अंजली पापडीवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

बिहारच्या पाटणा येथून आलेले चिरंजीलाल कासलीवाल, सुमतीदेवी, त्यांचे पुत्र अमितकुमार - मितू , मनीष-लता, नातू हिमांशू, निकुंज, सुरत येथून आलेले नातेवाईक जयकुमार सेठी, पवनकुमार छाबडा यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला. कर्नाटकातील कुन्नूर येथील नेमिनाथ खनगावी यांनी भक्तिभावाने पंचामृत अभिषेक केला. काल महामस्तकाभिषेकाच्या आठव्या दिवशी गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले.

स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले. महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, राजेंद्र कासलीवाल, अशोक दोशी, प्रमोद कासलीवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी ऑनलाईन संवाद साधला. प्रत्येकी एक मीटर कापडावर चार रंगांमध्ये भक्तांम्बर स्तोत्रातील 48 काव्यांचे लेखन केले जात आहे.

750 पैकी 550 भक्तांम्बर श्लोक - मंत्र तीन रंगीत पेनने कापडावर लिहून इंदोरला डॉ. प्रणामसागर महाराजांकडे पाठवण्यात आले आहेत. अंजली पापडीवाल यांनी 30 कपड्यांवर भक्तांम्बर श्लोक लिहिले आहेत. महामस्तकाभिषेक सोहळ्यात 108 फुटी मूर्तीसमोर त्यांचे भाविकतेने दररोज लेखन सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com