भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात

 भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात

नविन नाशिक| प्रतिनिधी New Nashik

साळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव ( Lord Shri Jiveshwar Jayanti )सोहळा सिडको साळी समाजातर्फे अहिर शिंपी समाज मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला .

यावेळी सकाळी भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव व आरती झाल्यानंतर जिव्हेश्वर पाळणा घेण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात येणार आले.

अहिर शिंपी समाज मंगल कार्यालय येथून पालखी निघून दत्तचौक, महाराणा प्रताप चौक, सिध्देश्वर मंदिर, गणेश चौक मार्गे शिंपी मंगल कार्यालयात येऊन पालखीची सांगता करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इतिहास तज्ञ व मोडी लिपी जाणकार सोज्वळ साळी तसेच तलाठी प्रांजल ढवण यांच्यासह मान्यवर व गुणवंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुरूष आणि स्त्रियांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी जिव्हेश्वर सेवा मंडळ व महिला मंडळ नवीन नाशिक प्रयत्नशील होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com