भगूरच्या आकांक्षाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

भगूरच्या आकांक्षाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

उझबेकिस्थान (Uzbekistan) येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अशियाई (Asia) स्पर्धेसाठी भारतीय रग्बी फुटबॉल संघात (Indian Rugby Football Team) भगूरच्या (Bhagur) आकांशा कातकाडे ची निवड झाली असून नाशिक (Nashik) जिल्ह्याला हा सन्मान प्रथमच प्राप्त झाला आहे.

नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन (Nashik District Rugby Association) व नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प (Deolali Camp) शाळेची खेळाडू आकांक्षा कातकाडे 18 वर्षखालील भारतीय रग्बी फुटबॉल संघात देशाचे नेतृत्व करणार आहे.

भारतीय रग्बी असोसिएशनच्या वतीने, 13 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत भुवनेश्वर (Bhubaneswar, Orissa) येथे भारताचा संघ निवडणे कामी विविध राज्यांतील 54 खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर (Training camp) व निवड चाचणी संपन्न झाली त्यात आकांक्षा ने केलेली जबरदस्त कामगिरी लक्षात घेऊन तिची निवड झाली आहे.

आकांक्षाला क्रीडा शिक्षक अनिल ढोकणे, मनोज कनोजिया ,सुनील देवरे, उज्वला घुगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शिक्षण मंडळ भगूर, नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प ,नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन, नाशिक जिल्हा क्रीडा संघटना (Nashik District Sports Association) व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आकांक्षा चे अभिनंदन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com