भगूरकरांची होणार मोफत स्वँब एन्टीजन व  RTPCR टेस्ट

भगूरकरांची होणार मोफत स्वँब एन्टीजन व RTPCR टेस्ट

देवळाली कॅम्प | Deolali Camp

भगूर येथील स्व सैनिक. नरसिंगराव बलकवडे व्यायामशाळेत सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये आज पासून मोफत स्वँब टेस्टिंग व RTPCR टेस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी दिली.

भगूर येथे मागील आठवड्यात कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आल्या नंतर काल अक्षय्य तृतीयाचे मुहूर्तावर मोफत स्वब तपासणी सुरू करण्यात आले, पाहिल्याचं दिवशी रुग्णांची टेस्टिंग केली असता त्यात तीन पॉझिटिव्ह व दहा निगेटिव आले आहेत.

आतापर्यंत या कोविड सेंटर मध्ये २५ रुग्णां दाखल झाले असून त्यांचे वर उपचार सुरू आहेत, त्यातील दहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अक्षय तृतीयोला भगूरकरांसाठी मोफत स्वँब टेस्टिंग व आरटीपीसीआर 13 रुग्णांची टेस्टिंग घेण्यात आल्या त्यात पॉझिटिव रुग्णांना कोविड सेंटर मध्ये तात्काळ उपचार सुरू केला आहे.

आजपासून दररोज सकाळी आठ ते अकरा च्या दरम्यान मोफत तपासणी होणार आहे. खाजगी ठिकाणी या तपासणी साठी रुपये बाराशे ची आकारणी केली जात आहे.

-प्रेरणा बलकवडे, नाशिक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com