भगूर-पांढुर्ली रस्ता धोकादायक

खड्डे देताय अपघाताला निमंत्रण
भगूर-पांढुर्ली रस्ता धोकादायक

देवळाली कॅम्प | Deolali Camp

भगुर-पांढुर्ली रस्त्याच्या (Bhagur Pandhurli Road) दोन्ही बाजूच्या कडेला खाचखळगे तसेच रस्ता समांतर गवत झाडे असल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या (Vehicles Driver) त्रास सहन करावा लागत आहे.

भगुर जवळील, दारणा नदीच्या (Darna River) पुलावरून राहुरी, दोनवाडे, विंचुरी दळवी व पांढुर्ली पर्यंतचा विविध गावासाठी दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेतीमळे आहे. यातील मुख्य रस्त्याच्या कडेला खड्डे खाचखळगे असुन त्यासमान घासगवत, झाडेझुडपे उगवली असल्याने वाहनचालकांच्या रात्रीच्या वेळी कसरत करावी लागते. अनेकदा अपघातांना (Accident) सामोरे जावे लागते. याबाबत सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाने (Sinnar Public Work Department) लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी राहुरी ग्रामस्थांनी केली आहे.

भगुर पांढुर्ली रस्त्यावर समस्यामुळे नेहमीच अपघात घडतात. दहा दिवसापूर्वी भगुर प्राथमिक शाळेचे (Bhagur Primary School) मुख्याध्यापक तानाजी सोनवणे सिन्नरहुन भगुर येत असताना याच रस्त्यावर रात्री आठ वाजेला

राहुरी समोर दुचाकीवरून घसरुन पडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

- सरपंच, संगिता संपत घुगे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com