पोलीस दादा आमच्या आई वडिलांचे भांडण मिटवा!

काही क्षणातच पोहोचले पोलीस; समज देताच वडिलांनीही मागितली माफी
पोलीस दादा आमच्या आई वडिलांचे भांडण मिटवा!

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

वेळेचे गांभीर्य ओळखणे ही दैनंदिन जीवनातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याचाच प्रत्यय भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) दोन चिमुकल्यांना आला...

शुक्रवार (दि. १) वेळ सायंकाळी साडेपाच वाजेची भद्रकाली पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात दोन अंदाजे 7 ते ८ वर्षाची लहान मुले आले आणि रडत रडत सांगू लागले की, आम्ही भीमनगरमध्ये राहतो आमच्या घरी पप्पा मम्मीला मारत आहेत तुम्ही चला.

ही गोष्ट दिसताना छोटी दिसत होती कारण आई वडिलांचे होणारे भांडण हे मुलांना सहण झाले नसावे आणि त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठले असावे. असे सांगून ते चिमुरडे तेथून निघून गेले.

त्या मुलांचा रडण्याचा आवाज आपल्या कार्यालयात बसलेले पोलीस निरीक्षक (प्रशासन) दिलीप ठाकूर (Dilip Thakur) यांनी ऐकला आणि त्यांनी बाहेर येत ठाणे अंमलदाराला या मुलांबद्दल विचारणा केली. मात्र ती दोन्ही मुले बाहेर निघून गेले असे त्यांनी सांगितले.

यावर पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी बाहेर त्या मुलांचा शोध घेतला असता ते त्या ठिकाणी आढळून आले नाही. ठाकूर यांनी तात्काळ बिट मार्शलला फोन करून भीमनगरमध्ये जावून कुणी नवरा बायकोचे भांडण सुरु आहे का? त्याचा तपास करा असे सांगितले.

यावेळी बिट मार्शल (Bit Marshall) म्हणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनीदेखील कर्तव्य दक्षता दाखवत भीमनगरच्या (Bhimnagar) दिशेने आपली गाडी नेली. दरम्यान पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी अन्य दोन अंमलदारांनादेखील त्याठिकाणी पाठवले.

या घटनेची चौकशी करून तात्काळ माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत भीमनगरमध्ये गेलेल्या अंमलदारांनी ठाकूर यांना फोन करून पती-पत्नीचे भांडण मिटले असून आम्ही त्यांना समज दिली आहे आणि यापुढे मी पत्नीला मारहाण करणार नाही असे पतीने सांगितले.

दरम्यान हा वाद जरी किरकोळ होता तरी जर मारहाणीत संबंधित महिलेला काही कमी जास्त झाले असते तर तिच्या मुलांचे पुढे काय झाले असते. पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी वेळेचे गांभीर्य ओळखल्याने हा वाद मिटला मात्र शहरातील इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समय सूचकता ओळखणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.