ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक : आ. डॉ. आहेर
मराठा आरक्षण

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक : आ. डॉ. आहेर

देवळा । प्रतिनिधी Deola

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने केलेल्या गंभीर चुका व दाखवलेल्या बेफिकीरीमुळेच आरक्षण (Reservations) गमवावे लागल्याने मराठा समाजाचे (Maratha community) गंभीर नुकसान झाले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर (mla dr. rahul aher) यांनी केली.

ठाकरे सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक (Cheating) केली याची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे (bjp) आयोजित पत्रकार परिषदेत (press conference) आ.डॉ. आहेर बोलत होते. यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर (keda aher) उपस्थित होते. महाआघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसत असल्याची टिका आ. डॉ. आहेर यांनी केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजपा (bjp) युती सरकारने 2018 साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी (Government job) व शिक्षणात आरक्षण (Reservation in education) दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती.

तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करतांना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे द्यावी लागतील.

केंद्र सरकारने (central government) घटनादुरस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारखे (sharad pawar) आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नसल्याचा आरोप आ.डॉ. आहेर यांनी केला.

भाजप सरकारने सारथी संस्था स्थापन करून समाजातील होतकरू तरुण-तरुणींना करिअर साठी भरघोस मदत केली होती पण ठाकरे सरकारने या संस्थेचे महत्त्व कमी केले आणि संस्थेच्या योजनांना कात्री लावली आहे. भाजपा युती सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करून मराठा समाजातील तरूण-तरुणींना भांडवल पुरवठा केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.

आता ठाकरे सरकारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारही ठप्प झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, निर्वाह भत्ता, शिष्यवृत्ती अशा फडणवीस सरकारच्या योजनाही आता ठप्प झाल्या आहेत. ठाकरे सरकारने मराठा समाजाची सर्व प्रकारे फसवणूक केली असल्याचा आरोप आ.डॉ. आहेर यांनी केला.

Related Stories

No stories found.