१०० रुपयांच्या दिवाळी कीटसाठी लाभार्थीं प्रतीक्षेत

१०० रुपयांच्या दिवाळी कीटसाठी लाभार्थीं प्रतीक्षेत

सिद्धपिंप्री । वार्ताहर | Siddhapimpri

गरिबांची दिवाळी (diwali) व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ग्रामीण भागातील (rural area) गरीब जनतेला रेशनकार्डवर (Ration card) 100 रुपयांत तेल, रवा, साखर, चणाडाळ मिळणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा कागदावरच राहण्याची शक्यता दिसू लागली आहे.

गरिबांसाठी तेल, रवा, साखर, चणाडाळ 100 रुपयांत देणार असल्याने मजूर कुटुंबांना आनंद झाला होता. कारण तशी घोषणा मुख्यमंत्री (Chief Minister) यांनी विधिमंडळात आणि दसरा मेळाव्यात केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनता दररोज स्वस्त धान्य दुकानदारांकडे याबाबत चौकशी करत आहे.

परंतु असे कुठलेही धान्य (grain) आले नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांंकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुकानदार आणि नागरिक यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले आहेत. दिवाळी (diwali) चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपली असतानाही किराणा साहित्य (grocery materials) स्वस्त धान्य दुकानात पोहोचले नाही. दोन दिवसात सदरचे साहित्य मिळाले नाही तर दिवाळीला त्याचा काहीएक उपयोग नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री जर नुसत्या घोषणाच करत असतील आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही गार्‍हाणे मांडायचे कुणाकडे? असा सवाल येथील सायकल दुकानदार सोमनाथ ढिकले यांनी केला आहे. आतापर्यंत ते दोन तीन वेळेस रेशन दुकानात (Ration shop) जाऊन आले. आज मिळेल उद्या मिळेल परंतु याबाबत कुठेच काही नाही. त्यामुळे माझ्यासह अनेक नागरिक नाराज झाले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विधिमंडळासह दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करून सदरचे साहित्य दोन दिवसात ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांत पोहोचवून त्याचे तत्काळ वाटप करून दिवाळी गोड करावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

अन्यथा इतर घोषणांप्रमाणेच आताची घोषणाही केवळ घोषणाच ठरते की काय अशी शंकाही नागरिक घेऊ लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस न पाडता प्रत्यक्ष दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com