अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थींना संवेदनशीलतेने न्याय द्यावा

अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थींना संवेदनशीलतेने न्याय द्यावा

अर्थसहाय्य योजना आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसेंचे आवाहन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

संजय गांधी योजनेसह (Sanjay Gandhi Yojana) इतर अर्थसहाय्य योजनेतील (Financial assistance schemes) लाभार्थ्यांशी प्रशासनासह अनुदान योजना समितीच्या (Grant Planning Committee) सदस्यांनी संवेदनशील राहून समन्वय साधत न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी येथे बोलतांना केले.

शासकीय विश्रामगृह सभागृहात राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना (Beneficiaries of National Family Financial Assistance Scheme) अर्थसहाय्याचे धनादेशाचे वाटप (Distribution of checks) कृषिमंत्री भुसे भुसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत (Review meeting) ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, तहसिलदार किशोर मराठे, नायब तहसिलदार विकास पवार, समिती अध्यक्ष प्रमोद पाटील, कृउबा उपसभापती सुनिल देवरे यांच्यासह संजय गांधी योजना सदस्य उपस्थित होते.

तालुकास्तरावरील संजय गांधी योजनेच्या नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करत कृषिमंत्री भुसे म्हणाले, समितीच्या प्रत्येक सदस्याने तळागाळातील वंचित लाभार्थ्यांना शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. गावनिहाय व गटनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात. संबंधित तलाठी व पात्र लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय साधून तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशी सुचना केली.

या आढावा बैठकीला बँकेचे प्रतिनिधी (Representatives of the bank) अनुपस्थित होत याबद्दल नाराजी व्यक्त करत ना. भुसे यांनी स्थानिक राष्ट्रीयकृत बँकांनी (Nationalized banks) आपल्या शाखेत लाभार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संगायोसारख्या अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आपल्या बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून लाभार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. योजनेतील महिला लाभार्थ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी हा वयोवृध्द असल्यामुळे त्यांच्याविषयी संवेदनशिल राहून त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विलंब करणार्‍यांना नोटीसा : निकम

अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या कामासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी बँकांसह तलाठ्यांनी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी यावेळी बोलतांना केले. संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे अर्थसहाय्य विलंबाने प्राप्त होण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी प्रत्येक गाव व गटनिहाय माहिती संकलीत करून होणारा विलंब ज्या तलाठ्यांमुळे अथवा ज्या बँकेमुळे होत असेल त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी अशा सुचनाही अपर जिल्हाधिकारी निकम यांनी यावेळी दिल्या.

गत दोन वर्षामध्ये मंजूर झालेल्या प्रकरणातील बरेच लाभार्थी हे मिळणार्‍या लाभापासून वंचित आहेत त्याची चौकशी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी मोहिम स्वरूपात कामकाज करण्याच्या सुचनाही निकम यांनी शेवटी केले.तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील तर सदस्य भगवान मालपुरे, महेंद्र साळुंखे, सुनिल पगार, गोरख शेवाळे, नाना निकम, दिपक तलवारे, आण्णा पवार आदींसह सदस्य उपस्थित होते. आभार तहसिलदार किशोर मराठे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com