रमाई घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित

लाभार्थ्यांचे नगरपंचायतीला निवेदन
रमाई घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित
रमाई आवास

पुनदखोरे । Punadkhore

कळवण नगरपंचायत (Kalwan Nagarpanchayat) अंतर्गत येणार्‍या रमाई आवास घरकुल योजनेचा (Ramai Gharkul aavas Yojna)पुर्नतः बोजवारा उडाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना या योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे. रमाई आवास घरकुल योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी कळवण शहरातील (Kalwan city) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (Dr BR ambedkar Nagar)येथील लाभार्थ्यांनी निवेदनाव्दारे नगरपंचायत (Request To nagarpanchayat) प्रशासनाकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2018 - 19 या कालावधीत रमाई आवास घरकुल योजनेतंर्गत कळवण नगरपंचायत प्रशासनाकडे (Kalwan Nagarpanchayat administration) प्रस्ताव सादर करण्यात आले होते. याबाबत लाभार्थ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अधिकारी व कर्मचार्‍यांकडे वारंवार चौकशी (Frequent inquiries from employees) केली असता संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळ मारून उडवाउडवीची उत्तरे देत प्रस्ताव वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहे.

मंजुर झाल्यावर तुम्हास कळवू अशी उत्तरे अधिकार्‍यांकडून देण्यात आली. कळवण तालुक्यातील जवळ जवळ सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये रमाई आवास घरकुल योजना मंजूर पण झाली. लाभार्थ्यांना त्याचा लाभ सुद्धा मिळाला. पंरतू कळवण नगरपंचायत प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर पाठ पुरावा का केला नाही? असा सवाल उपस्थित राहत आहे. तरी लवकरात लवकर रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत येणारी घरकुल योजना नगरपंचायत प्रशासनाने मंजूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर सरला बस्ते, आशाबाई लोंखडे, संगिता बस्ते, प्रभावती आहिरे, बायजाबाई बस्ते, नितिन बस्ते, नामदेव बस्ते, विकास बस्ते, देविदास बस्ते, अशोक बस्ते, नाना पवार, मन्सूरी आदींसह लाभार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

घरकुल योजना अनुसुचित जाती व जमातीच्या घटकांसाठी आहे. शहरातील रामनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रोहीदास वाड़ा, वाल्मीक नगर, आण्णाभाऊ साठे नगर, आमराई आदी भागातील लाभार्थ्यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे घरकुला संदर्भात प्रस्ताव सादर केले आहे. यात काही लाभार्थी असे आहेत की, अक्षरशा त्यांना घरे उपलब्ध नसल्याने ताडपत्री बांधुन उन्हाळा, पावसाळा व हीवाळ्यात उघडयावरच आपल्या कुंटूबियांसमवेत राहावे लागत आहे.

रमाई आवास घरकुल योजनाचे काही प्रकरणे म्हाडा कडे वर्ग करण्यात आलेले आहे. आज उर्वरीत प्रकरणे वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आलेले आहे.योजनेसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलांचा लाभ मिळणार

- सचिन पटेल, मुख्याधिकारी- कळवण नगरपंचायत

रमाई आवास घरकुल योजनेसंदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच अधिकारी वर्गाकडे चर्चा करुन सुद्धा घरकुल योजना मार्गी लागत नसल्याने यात नगरपंचायत प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे.

- रंजना जगताप, नगरसेविका, कळवण नगरपंचायत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com