छटपूजेला सुरुवात; यंदाही भोजपुरी गीतांचा कार्यक्रम

छटपूजेला सुरुवात; यंदाही भोजपुरी गीतांचा कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चार दिवस चालणार्‍या श्रद्धेचा उत्सव छटपूजेला (Chhath Puja) शुक्रवारपासून उत्तर भारतीय भाविकांच्या उपवासाने सुरुवात झाली.विशेष प्रथा आणि नियमांचे पालन करून, भाविकांनी स्नान करून भगवान सूर्य आणि छटी मैय्याचे स्मरण करून त्यांची पूजा स्वीकारण्याची प्रार्थना केली. पूजेेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. उपवास करणार्‍यांनी तन, मन, धनाने तयारी केली. कार्तिक शुक्ल षष्ठीला छटपूजा केली जाते.

सूर्योपासनेचा हा सण नदीकिनारी साजरा केला जातो. या दरम्यान सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करून आणि छटी मैयाची पूजा केली जाते. छट महापर्व हा चार दिवसांंचा असतो. कार्तिक महिन्याच्या चतुर्थीपासून सुरू होणारा आणि सप्तमीपर्यंत साजरा होणारा हा महोउत्सव 4 दिवसांचा असतो. यावेळी छटपूजा 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. करवंद भाजी, हरभरा डाळ आणि तांदूळ खाऊन भाविकांनी शुक्रवारी विधीवत स्नान करून छटपूजेला सुरुवात केली. सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देईपर्यंत चालणार आहे. आज रविवारी सायंंकाळपासून उत्तर भारतीय नागरिक गोदाकाठी जमतील.

छटपूजेसाठी महिला उसाचे चौरंग मांडून पूजा करतील. गोदापात्रात दिवे सोडले जातील. उत्तर भारतीयांच्या विविध संस्थांनी रामकुंड परिसरात मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्रभर कार्यक्रम साजरा करून सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पूजा पूर्ण होणार आहे.

गणराज बहुउद्देशीय संस्थेने यंदाही भोजपुरी गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे उमापती ओझा यांनी कळवले आहे. सायंकाळी होणार्‍या कार्यक्रमास खा. हेमंंत गोेडसे, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, गुरुमीत बग्गा, धनंजय बेळे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत. निखील पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजभाऊ पाटील, सुभाष अग्रहारी, अयोध्या यादव, रवी सोनार, संतोष कोकाटे आदी प्रयत्नशील आहेत.

यासाठी होते छटपूजा

कोणतेही संकट येऊ नये, जीवनात भरभराटी, उन्नती होण्यासाठी महिला छटपूजा करतात. त्या घरीच दोन दिवस उपवास करतात व रात्री खीर व फळे खातात. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देतात व चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन तीन दिवसांचे उपवास सोडतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com