'ती' देतेय मधुमक्षिका पालनाचे धडे

'ती' देतेय मधुमक्षिका पालनाचे धडे

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक तालुक्यातील माडसांगवी या गावात कृषिकन्या ऋतुजा मटाले हिने मधमाशी पालनाबाबत जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक येथील म. वि.प्र. समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील ग्रामिण कृषि कार्यानभव या कार्यक्रम अंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ऋतुजा मटाले हिने मधमाशी पालनाबाबत माहिती देताना मधमाशीपासून मधाशिवाय अन्य उपपदार्थ मिळतात जसे की मेन, परागकण, राजाल हे देखील सांगितले. याशिवाय सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मधमाशीद्वारे वेगाने होणारे परागीभवन" त्यामुळे विविध पिकांमध्ये फळधारणा वाटून उत्पादनात भरघोस वाढ होते. शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन हा शेतीला एक जोडधंदा म्हणून निर्माण होऊ शकतो, हे देखील तिने सांगितले.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांचे मधमाशी पालनाबाबत सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते, प्रा. डॉ. भगरे, प्रा. सी. एस. देसले, प्रा. के. जे. पानसरे तसेच विषयतज्ञ आणि मधमाशी अभ्यासक प्रा. डॉ. डी. एस. शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com