मधुमक्षिका पालनाला चालना मिळणार; वन विभाग करणार प्रयत्न

मधुमक्षिका पालनाला चालना मिळणार; वन विभाग करणार प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी

मधमाशांमुळे जंगलातील दुर्मिळ वृक्षांच्या, सुगंधी फुलांच्या आणि औषधी वनस्पतींच्या वनक्षेत्रातील मोकळ्या जागेत परागीभवन होऊन वनसंपदेत समृद्धता वाढते. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने आदिवासी पाड्यांमध्ये मधुमक्षिका पालनाला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून वनोपजाची तस्करीस आळा बसणार असून, स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मधुमक्षिका पालनासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची मदत घेतली जाणार आहे...

नाशिकच्या जंगलक्षेत्रात अनेक दुर्मिळ प्रजातींचे वृक्ष, फुले आहेत. वनवृत्तातील अनेक आदिवासी पाड्यांवरील जंगल रक्षणार्थ उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातात. आता आदिवासी दुर्गम भागात 'आदर्श गाव' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी मधुमक्षिका पालन प्रकल्प वनक्षेत्रात उभारण्यात येईल. त्या माध्यमातून वनव्यवस्थापन समितीला लाकडी पेट्या दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये मधमाशांचे संगोपन आणि संवर्धन केले जाईल. त्यासाठी पाडे निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे.

मध काढण्यासह मधमाशा पालनाचे प्रशिक्षण समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीसह तेथील वनसंपदा अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. समृद्धतेसह मधुमक्षिकांचे संगोपन, संवर्धन आणि रोजगारासाठी हा पॅटर्न महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा वनविभागाकडून केला जात आहे. दरम्यान, मधुमक्षिका पालनासाठी काही पाड्यांची नावे विचाराधीन आहेत. जंगलांच्या विस्ताराबरोबरच मधमाशांचे संगोपन, संवर्धन आणि ग्रामस्थांसाठी आर्थिकवृद्धीसाठी प्रयत्न होणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com