गोवंशाची अवैध वाहतूक करणारी पिकअप उलटली

गोवंशाची अवैध वाहतूक करणारी पिकअप उलटली

दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad

देवळा तालुक्यातील (Devla taluka) नागिनबारी-चिंचवे रस्त्यावर (Naginbari-Chinchwe Road) वाखारीकडून मालेगावच्या (Malegaon) दिशेने गोवंशाची अवैध वाहतूक करणारी पिकअप उलटल्याची घटना आज मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली...

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा व परिसरातील गोरक्षकांना (Cow Guard) एक पिकअप गोवंशाची अवैध वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर गोरक्षकांनी पिकअप क्रमांक एम.एच. ४१ ए.जी.५७५ चा पाठलाग केला असता रस्त्याच्या कडेला चाक निखळून पडल्याने पलटी झाल्याचे दिसले.

त्यावेळी पिकअपमध्ये एकूण नऊ जनावरे (Animals) दाटीवाटीने अमानुषपणे कोंबलेली आढळून आली. त्यामध्ये दोन बैल, पाच वासऱ्या व दोन गाईंचा समावेश होता. त्यापैकी एक वासरी मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे (Deola Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, एएसआय विनय देवरे, पोलीस कर्मचारी कोरडे, शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच याबाबत अद्यापपर्यंत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com