बिटको हॉस्पिटलमध्ये आता टोकन पद्धतीने बेड

बिटको हॉस्पिटलमध्ये आता टोकन पद्धतीने बेड
USER

नाशिक रोड | Nashik

महापालिकेच्या येथील बिटको हॉस्पिटलमध्ये यापुढे आता कोरोना रुग्णांना टोकण पद्धतीने बेड उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जुल यांनी दिली.

प्रभाग सभापती जयश्री खर्जुल विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर डॉक्टर जितेंद्र धनेश्वर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नगरसेवक रमेश धोंगडे जगदीश पवार यांच्या उपस्थितीत बिटको हॉस्पिटल मधील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विविध प्रकारच्या सूचना खर्जुल यांनी केल्या बिटको हॉस्पिटल मध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे आता टोकण पद्धतीनेच रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जातील.

रेमडीसीवर इंजेक्शन बाबत अनेक रुग्णांच्या नातेवाईकां च्या तक्रारी लक्षात घेता यापुढे आता इंजेक्शन देताना पेशंटचे नाव आधार कार्ड व मोबाईल नंबर तसेच पेशंट ची सही घेऊनच इंजेक्शन द्यावे.

तसेच याबाबत रजिस्टर मेंटेन करावे ज्या पेशंटचे ऑक्सिजन लेवल 95 च्या पुढे असेल अशा पेशंटला चेक करून बेड रिकामा करून घेतला जावा. तसेच पेशंटला सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान नाष्टा सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान हॉस्पिटलतर्फे जेवण देण्यात येईल असे सभापती कर्जुले यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे डॉक्टर नर्स यांनी पेशंट व नातेवाईकांनी एकमेकाशी सौजन्याने बोलावे म्हणजे वाद होणार नाही, त्याचप्रमाणे स्वच्छता ठेवण्याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com