Photo : डोळ्याचं पारणं फेडणारा दुगारवाडी धबधबा; पाहा भन्नाट फोटो

Photo : डोळ्याचं पारणं फेडणारा दुगारवाडी धबधबा; पाहा भन्नाट फोटो

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) येणारा दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfall) पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. सध्या दुगारवाडी धबधबा उंचावरून कोसळत असून पर्यटकांना भुरळ घालत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis) पर्यटकांना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दुगारवाडी धबधब्यावर करोनाचा परिणाम नसून नेहमीप्रमाणे मोहिनी घालत आहे. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर आणि अधूनमधून सातत्याने संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावू लागते. जणू नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) हे कोकणच!

त्र्यंबकपासून जव्हार (Jawhar) कडे जाणाऱ्या रस्त्याने गेलं की सापगाव लागत. याच गावातून पुढे काचुर्ली रस्त्याला लागतो. का चुर्ली गावगातून पायी दुगारवडी धबधब्याकडे जाता येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com