आयएमएतर्फे रंगली सुश्राव्य संगीत मैफल

आयएमएतर्फे रंगली सुश्राव्य संगीत मैफल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठी रसिकमनावर अधिराज्य गाजविणारी एकाहून एक सरस सदाबहार गीते (lyrics) सादर करणारे कलाकार, व त्यांना मुक्तकंठाने दाद देणारे श्रोते. यांचे दर्शन घडले.

आयएमए सभागृहाच्या प्रांगणात शब्दसुरांचा सडा पडला अन् कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेल्या कोमल सुरावटींनी रसिकांची दिवाळीतील (diwali) सकाळ अधिकच रम्य झाली. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या (Indian Medical Association) नाशिक (nashik) शाखेचा महिला विभाग आणि स्वरसाज एंटरटेन्मेंटतर्फे (Swarsaj Entertainment) प्रथमच दिवाळीनिमित्त सुश्राव्य गीतमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. शालिमार येथील आयएमए सभागृहाच्या प्रांगणात सकाळी सव्वासहाला ‘गगन सदन तेजोमय’ हे वसंत बापट यांचे गीत गायिका श्रृती जोशी यांनी सादर केले आणि या मैफीलीचा श्रीगणेशा झाला.

स्वर आले दुरुनी, केव्हा तरी पहाटे, पाहिले न मी तुला, दिस चार झाले मन, यासारखी सदाबहार गीते नचिकेत देसाई, सई जोशी यांनी सादर केली. त्यांना उत्स्फुर्त दाद मिळाली. गीतकार वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, सुरेश भट, सुधीर मोघे, शांता शेळके, राजा बडे, ग.दि.माडगूळकर, ना.धों.महानोर, सौमित्र, गुरु ठाकूर अशा एकेका गीतकारांच्या रचना घेत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘कळीदार कपुरी पान’ ही राजा बडे यांची रचना सादर होण्यापूर्वी अप्रतिम ढोलकीवादन करणार्या सिध्दार्थ कदमही रसिकांची दाद मिळाली.

यावेळी अक्षय कावळे, प्रणव हरिदास, सौरभ शिर्के, सिध्दार्थ कदम या वादकांनी स्वरसाज चढविला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘जयोस्तुते जयोस्तुते या रचनेने सांगता झाली. यावेळी डॉ. प्रशांत देवरे यांचा सत्कार करण्यात आला. ‘आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, डॉ. शलाका बागुल, डॉ. प्रेरणा शिंदे, सचिव डॉ. विशाल पवार यांनी संयोजन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com