हरसूल जवळील मनमोहक असा दावलेश्वर धबधबा

हरसूल जवळील मनमोहक असा दावलेश्वर धबधबा

हरसूल | Harsul

ग्रामीण भागात पावसाने अधूनमधून रिपरिप चालूच ठेवल्याने नदी- नाले ओहळ ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे नदीच्या पात्रात देखील वाढ झाली आहे. अशातच लहान मोठे धबधबे (water fall) ही खुणावू लागले आहे

हरसूल (Harsul)परिसराला निसर्गसौंदर्यांची देणं लाभलेली आहे. अनेक लहान मोठे पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे (water fall) देखील येथे पाहायला मिळतात. असाच एक धबधबा म्हणजे दावलेश्वर येथील रोसा धबधबा होय. महाराष्ट्र - गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागातून वाहत असलेली दमणगंगा नदीच्या पात्रात दावलेश्वर येथील रोसा धबधबा खळाळून वाहतो आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com