कौतुकास्पद! कचरा कुंडीच्या जागी सुशोभीकरण

कौतुकास्पद! कचरा कुंडीच्या जागी सुशोभीकरण

देवळाली कॅम्प | Deolali Camp

स्वच्छ भारत अभियानात (Swachh Bharat Abhiyan) राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Deolali Cantonment Board) आरोग्य विभागाने (Health Department) शहराच्या काही भागात राहिलेल्या रस्त्यांना 'कचरा कुंडी मुक्त' करण्याचा ध्यास घेतला आहे...

'एक कदम स्वच्छता की ओर' म्हणत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशनच्या (Swachh Bharat Mission) हाकेला प्रतिसाद देऊन कचरा कुंडी (waste bin) काढून तेथे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया (Bhagwan Kataria) यांनी याप्रश्नी बोर्डाच्या शेवटच्या सभेत शहराच्या मुख्य रस्त्यावर ये-जा करतांना नजरेस पडणाऱ्या कचरा कुंड्या हटविण्याची सूचना केली होती.

घराघरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत असल्याने या कुंडयाकडे होणारे दुर्लक्ष शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण करणारे ठरत होते. याशिवाय व्यावसायिकांकडून येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता.

आरोग्य विभागाचे अधिक्षक अमन गुप्ता यांनी ही बाब हेरून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा कुंडी काढून टाकण्यात आल्या. त्या जागी डेंग्यू निर्मूलनासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमा झालेल्या टायरचा वापर करत भिंतीवर स्वच्छ, सुंदर व हरित देवळालीचा संदेश दिला आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डात लोकप्रतिनिधी असताना अखेरच्या सभेत आपण नागरिकांकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आरोग्य विभागास सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी हे काम करताना अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर केले आहे.

भगवान कटारिया, माजी उपाध्यक्ष.

स्वच्छ भारत अभियानात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर काही भागात पर्याय म्हणून ठेवलेल्या कचराकुंड्याही यापुढील काळात संपूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहे. नागरिकांनी दाराशी येणाऱ्या घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा.

अमन गुप्ता, आरोग्य अधीक्षक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com