परिचारिकेला मारहाण; जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन

परिचारिकेला मारहाण; जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) गर्दी करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेर जाण्याचे सांगितल्याने त्याचा राग आल्याने

रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करून परिचारिकेसह मावशीला मारहाण (beating) केल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये दोघी जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान परिचारिकेला मारहाण (Beating the nurse) झाल्याने जिल्हा रुग्णालयातील सेवकांनी काम बंद आंदोलन (Work stoppage agitation) केले होते. जिल्हा शैल्य चिकित्सकांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन (agitation) मागे घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सतत परिचारिका तसेच डॉक्टर, सेवकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहे.

त्यातच आज सकाळी साफसफाई सुरू होती तर डॉक्टरांचा (doctors) देखील राऊंड होता त्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना परिचारिकेने बाहेर जाण्यासाठी सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून काही वेळानंतर अचानक परिचारिकेवर हल्ला केला. त्यामध्ये मावशी आल्याने मावशीला देखील मारहाण करण्यात आली.

रुग्णालयात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जिल्हा रुग्णालयात काम करणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आलीय. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com