शेतकर्‍यास मारहाण; व्यापार्‍यांचे परवाने निलंबीत

शेतकर्‍यास मारहाण; व्यापार्‍यांचे परवाने निलंबीत

मालेगाव । प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Malegaon APMC भाजीपाला व फळफळावळ विभागात विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे वाहन आपल्या दुकानासमोर कां लावले नाही या कारणावरून कुरापत काढून शेतकर्‍यास मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बेदम मारहाण करत The farmer was beaten by traders दमबाजी करणार्‍या धनश्री व्हेजीटेबल कंपनी व रेणुका माता व्हेजीटेबल कंपनीच्या दोघा व्यापार्‍यांचे परवाने निलंबीत करण्याची कारवाई बाजार समितीतर्फे करण्यात आली असल्याची माहिती सचिव अशोक देसले यांनी दिली.

शेतकर्‍यास मारहाणी संदर्भात या दोन्ही फर्मचा सहभाग असल्यामुळे बाजार समितीसह भाजीपाला व्यापार्‍यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे या मारहाण प्रकरणाची संपुर्ण चौकशी होईपर्यंत 8 ऑक्टोंबरपासून धनश्री व रेणुका व्हेजीटेबल कंपनी या दोन्ही फर्मचा भाजीपाला आडत व खरेदीचा व्यवसाय परवाना पुढील सुचना होईपर्यंत निलंबीत करण्यात आला आहे.

या संदर्भात दोघा व्यापार्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून नोटीसमधील सुचनांचे पालन न केल्यास सदरचे गाळे बाजार समिती प्रशासन खाली करून घेत ताब्यात घेण्याची कारवाई करणार असल्याचा इशारा सचिव देसले यांनी दिला आहे.

बाजार समितीतील फळफळावळ विभागात परवा मध्यरात्री वसंतवाडी, ता. पारोळा येथील दिलीप काशिनाथ पवार व ताजमल पवार हे दोघे शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी वाहनातून घेवून आले होते. मात्र त्यांनी आपल्याऐवजी दुसर्‍या व्यापार्‍याकडे शेतमाल विक्रीसाठी वाहन लावल्याने या दोन्ही फर्मच्या व्यापारी व त्यांच्या साथीदारांनी शेतकर्‍यांना बेदम मारहाण करत दमबाजी केली होती.

मार्केट कमेटीसह शहर सोडण्याचा दम देत या शेतकर्‍यांना बाजार समितीतून हुसकावून देण्यात आले होते. या संदर्भात समिती प्रशासनाकडे लेखी तक्रार शेतकरी दिलीप पवार यांनी दाखल केल्याने याची गंभीर दखल घेत सभापती राजेंद्र जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. दरम्यान या संदर्भात बाजार समिती कार्यालयात सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे यांच्यासह संचालक तसेच भाजीपाला असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक होवून दोघा व्यापार्‍यांचे परवाने निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.