लसीकरण केंद्रावर डॉक्टरांना मारहाण

पंचवटीतील इंदिरागांधी रूग्णालयातील घटना
लसीकरण केंद्रावर डॉक्टरांना मारहाण

नाशिक | Nashik

लसीकरणासाठी वेळ लागल्याने संतप्त झालेल्या एकाने वैद्यकीय अधिक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पंचवटीतील इंदिरागांधी रूग्णालयात मंगळवारी (दि.१८) सायंकाळी घडला.

मृणाल भालचंद्र घोडके (रा. टाकळीरोड, द्वारका) असे मारहाण करणार्‍या संशयिताचे नाव असून त्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी वैदकीय अधिक्षक विजय देवकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार मंगळवारी सायंकाळी लसीकरण सुरू असताना तेथे अचानक आलेल्या घोडके याने माझी आई लसीकरणासाठी आली असून इतका वेळ लागतो का असी विचारणा करत तेथील डॉक्टरांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. तसेच देवकर यांना धक्काबुक्की केली.

याप्रकरणी घोडके विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक यु. आर. गवळी करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com