आरोग्य सेवकास मारहाण; गुन्हा दाखल

आरोग्य सेवकास मारहाण; गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सिन्नर तालुक्यातील Sinnar Taluka पास्ते Paste येथील आरोग्य सेवकास Health Worker झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्याने दोषी व्यक्तींवर 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य सेवकास मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कलम ३५३ लावावा व दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावे.या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संवर्ग संघटना एकत्र झाल्या.

त्यांनी जिल्हा परिषद आवारात या घटनेचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.संबंधित दोषी व्यक्तींवर 353 कलम लावण्यासंदर्भात तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे ,तसेच सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन संघटनाची बोलणीसाठी सर्व खाते प्रमुख यांनी वेळ द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोषी व्यक्तींवर 353 कलम लावण्यासंदर्भात सिन्नर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा व तेथे सदर केस दाखल करण्यासंदर्भात दुजोरा दिला.

त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे पदाधिकारी दुपारी दोन पासून रात्री आठ वाजेपर्यंत सिन्नर पोलीस स्टेशन येथे थांबले. पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासमवेत याबाबत चर्चा करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी गुन्हा दाखल करून त्याबाबत कार्यवाही करत असल्याचे सांगितले.

संबंधित व्यक्तीवर भादवी कलम 353 ,323 ,504, 506, 34 व 4 लागू केल्यामुळे व दोषी व्यक्तीस अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले.

यापुढे सर्व कर्मचारी वर्गाने आपणास नेमून दिलेले शासकीय निकषाप्रमाणे सर्व कामकाज करण्यात यावे, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी लसीकरणाचे काम सुरू करणार असल्याबाबतचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा नाशिक व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस कर्मचारी संघटना व सर्व संवर्गीय संघटना यांनी आपली सर्व कामे करण्यास हरकत नसल्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे

या प्रकरणात सर्व संघटना एकत्र झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सर्व संवर्गीय संघटनांचे सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.