पेट्रोलसाठी हेल्मेट न दिल्याने मारहाण

पेट्रोलसाठी हेल्मेट न दिल्याने मारहाण

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

पेट्रोल petrol भरण्यासाठी हेल्मेट Helmet न देणा-या युवकाला तीन युवकांनी जबर मारहाण केली. जेलरोड येथील आढाव पेट्रोल पंपावर Aadhav Petrol Pump ही घटना घडली. सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात हल्लेखोरांनी पळ काढला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात युवकाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, पंपाचे चालक ड. मुकुंद आढाव आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप यादव यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जखमी युवकाचे नाव आकाश विश्वकर्मा (रा. पंचक, जेलरोड) Aakash Vishvakarma असे आहे. तो हेल्मेट घालून 20 नोव्हेंबरला सायंकाळी या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याचवेळी तीन युवक आले. एकाने आकाशकडे पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट देण्याची मागणी केली. आकाशने नकार दिल्याने त्यांना राग आला. तिघांनी आकाशला दमदाटी व शिवीगाळ केली. एकाने आकाशचे हेल्मेट हिसकावून डोक्यात मारल्याने आकाश जखमी झाला. मारहाणीत हेल्मेट तुटले.

विश्वकर्माने पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना पोलिसांना कळविण्याची व सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोरांचे फोटो मोबाईलमध्ये देण्याची विनंती केली. पोलिसांनी मागणी केल्यास आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज देऊ, असे कर्मचा-यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आकाशच्या वडिलांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना मारहाण झाल्यास पोलिस त्वरित कारवाई करतात. मात्र, ग्राहकांना मारहाण झाली तर कारवाई होत नाही हे अन्यायकारक आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप यादव यांनी केली आहे. पंपचालक मुकुंद आढाव यांनीही कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी, कायदे पाळणा-या ग्राहकांना संरक्षणासाठी हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com