सावधान! 'निगेटिव्ह' असाल तरच विमानतळावर प्रवेश

सावधान! 'निगेटिव्ह' असाल तरच विमानतळावर प्रवेश

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्य शासनाने इतर राज्यातून रेल्वे व विमानाने येणार्‍या प्रवाशांना करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे. त्याच पार्श्वभुमीवर जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर असून ओझर विमानतळावर येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जाईल. नाशिकमध्ये येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी नियमावली तयार करण्याचे काम जिल्हाप्रशासनाकडून सुरु आहे.

राज्यभरात करोनाची परिस्थिती पुर्वीच्या तुलनेत नियत्रंणात असली तरी दुसर्‍या लाटेचे संकट राज्यापुढे आहे. नाशिक जिल्ह्यातही करोना उतरणीला लागला असताना दिवाळीनंतर रुग्णसंख्येत भर पडत असुन त्यामुळे चिंता वाढली आहे. अजूनही टळलेला नसल्याने राज्य शासनाप्रमाणे जिल्हाप्रशादन अलर्ट मोडवर आहे.

नाशिकमध्ये येण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. विशेषत: विमान प्रवाशांची पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने दिल्ली, गोवा, राजस्थान गुजरात या राज्यामधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले आहेत. ओझर विमानतळावरुन बंगळुरू आणि हैद्राबादसाठी हवाईसेवा सुरु आहे. या विमानतळावर परराज्यातील प्रवासी उतरणार असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे प्रवाशांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

विमान प्रवाशांना कशाप्रकारचे आणखी निर्बंध असू शकतील याची सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नसली तरी प्रवाशांकडे करोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक असणार आहे. अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांना शहरात प्रवेश मिळणार आहे.

पॉझिटिव्ह अहवाल असेल तर अशा प्रवाशांना क्वारंटाइन केले जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर जिल्ह्याची सिमा गुजरातला लागून आहे. रेल्वे, विमाना प्रमाणे एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठि जिल्हाप्रशासनाकडून गाईडलाईन्स जारि होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com