राष्ट्रवादीत सक्रिय व्हा

काँग्रेस कार्यकर्त्यांना माजी आ. रशीद यांचे निर्देश
राष्ट्रवादीत सक्रिय व्हा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष (congress party) फक्त मालेगावात (malegaon) जिवंत आहे. 17 वर्षे आपण जिल्हाध्यक्ष (district president) म्हणून काम करत पक्षाला मजबूत केले. मात्र पक्षात प्रामाणिकपणे काम करणार्‍यांची कदर नाही. जे पक्षाला मजबूत करू शकत नाही किंबहुना ज्यांच्या कारकिर्दीत पक्षाची घसरणच झाली अशांना मात्र प्रदेश कार्यकारिणीवर मोठी पदे दिली जातात.

हे पटत नसल्यामुळे आपण जिल्हाध्यक्ष पद सोडल्याचे स्पष्ट करत माजी आ. शेख रशीद (former mla rashid shaikh) यांनी विरोधकांतर्फे सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठीच आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत (nationalist congress party) सक्रिय होण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसातच माजी आ. शेख रशीद यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा आदेश देत पक्षाला पुन्हा हादरा दिला.

नगरसेवकांसह आपण पक्षातच राहणार असून पक्ष नेतृत्व ज्यांच्याकडे शहराची धुरा सोपवतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत. मात्र आपल्या कुटूंबात वाद व तणाव असल्याच्या विरोधकांच्या अपप्रचाराला मुठमाती देण्यासाठीच आपण कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत सामील होण्याचे निर्देश दिले आहेत. योग्य वेळ येताच नगरसेवकांसह (Corporators) आपणही योग्य निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच शेख रशीद यांनी केले आहे. त्यांचीही आगामी वाटचाल राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे अस्पष्टरित्या संकेत त्यांनी दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी, कार्यकर्ते (Activists) जात आहेत या संदर्भात पृच्छा केली असता शेख रशीद यांनी या पक्षातून त्या पक्षात हे आता नवीन राहिलेले नाही. आपण पदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून विरोधक देखील अपप्रचार करत आहेत. काँग्रेसमध्ये देखील प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना स्थान राहिलेले नाही.

त्यामुळे कार्यकर्त्यांनी व्दिधा मनस्थितीत राहू नये यास्तव त्यांना राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचे निर्देश आपण दिले असल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणूक (upcoming municipal elections) आपण लढणार नसल्याचे स्पष्ट करत माजी आ. शेख रशीद यांनी मात्र विधानसभा निवडणुकीबाबत (assembly elections) बोलणे टाळले. त्यांचे पूत्र माजी आ. आसिफ शेख हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची कोंडी होवू नये म्हणून शेख रशीद यांनी हा पवित्रा घेतल्याचे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com