
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठी विविध दिवस, सप्ताहांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये सहभागी होतांना तसेच माध्यम क्षेत्राच्या सहकार्याने आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यावर भर द्यावा. आरोग्य सेवा देत असतांना सामाजिक बांधिलकी जोपासत राहा, असे प्रतिपादन इंडियन अकॅडेमी ऑफ पेडीयाट्रीक्सचे (Indian Academy of Paediatrics )महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष काश्यपे (Dr. Subhash Kashyape )यांनी केले.
शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित इंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स नाशिक डिस्ट्रीक्ट शाखेच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, नवनिर्वाचित सचिव डॉ. सचिन पाटील यांच्यासह मावळते अध्यक्ष डॉ. केदार मालवतकर, मावळते सचिव ऋषिकेश कुटे, खजिनदार डॉ. प्राची बिरारी, सहसचिव डॉ. मिलिंद गांगुर्डे, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. सचिन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. कार्यकारी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.स्नेहल भामरे, व डॉ.जागृती विसपुते यांनी तर डॉ.सचिन पाटील यांनी आभार मानले.