मुलभूत विकासकामे रखडली

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा
मुलभूत विकासकामे रखडली

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

जनसुविधा (Jansuvidha) विभागांतर्गत प्राप्त अनुदानातून (Grants) सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) शहरातील मुलभूत विकासकामे (Basic development works) तत्काळ सुरू करावीत अन्यथा धरणे आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Nationalist Congress) देण्यात आला आहे.

याबाबत सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देवरे (Executive Engineer Suresh Deore) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष अनंत भोसले (Metropolitan Executive President Anant Bhosale) व प्रदेश सचिव दिनेश ठाकरे (State Secretary Dinesh Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन (memorandum) देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते सा.बां. विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेले असून रस्त्यांची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. शहरातील मुलभूत विकासकामांसाठी सा.बां. विभागास जनसुविधा विभागांतर्गत अनुदान प्राप्त झालेले असून त्या संदर्भात 1 ते 15 कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

सदर कामांच्या निविदा मागवून चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटला असून अद्यापही कामे सुरू झालेली नाहीत. प्रस्तावित कामांमध्ये अ‍ॅरोमा स्टॉप, बँक कॉलनी, आनंद नगर ते डी.के. गार्डनपर्यंत रस्ता रूंदीकरण (Road widening) व काँक्रीटीकरण (Concretization), मोसमपुल ते गिरणा पुल रस्ता दुभाजक दुरूस्ती व सुशोभिकरण, शहरातील प्रमुख मार्गांवर दिशादर्शक फलक लावणे, काकाजी मसाला सेंटर ते बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल,

साठफुटी रोड ते सोयगाव मार्केट काँक्रीटीकरण, भुमीगत गटार (Underground sewers) तयार करणे, बाळासाहेब ठाकरे क्रिडासंकुल येथे जाँगिंग ट्रॅक (Jogging track), साऊंड सिस्टीम, विद्युतीकरण व इतर अनुषंगीक कामांसह साठफुटी रस्त्यास पदपथ व पथदीप व्यवस्था करण्याच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी निविदा सुचना क्र. 11/स.नं. 2021-22 प्रसिध्द झालेली असून त्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते सा.बां. विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेले असून या रस्त्यांची दैन्यावस्था झालेली आहे. रस्त्यांची कामे सुरू झाली नसल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे (Potholes) अपघातांचे (accident) प्रमाण वाढले आहे. नागरीकांना मणक्यांचे आजार होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. भुयारी गटारीची कामे काही ठिकाणी झाली असली तरी त्यांचे पाईप फुटलेले आहेत. काही ठिकाणी योग्य उतार न करता भुयारी गटारीची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा प्रादुर्भाव होवून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते. यास्तव सर्व कामे योग्य त्या आराखड्यानुसार झाली पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

निविदा मागवूनही चार ते पाच महिने कामे सुरू झाली नसून ती त्वरेने सुरू करावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. शिष्टमंडळात मनमोहन शेवाळे, कल्पेश गायकवाड, राहुल पवार, सतिष शिंदे, शुभम खैरनार, शुभम पाटील, विजय जगताप, योगेश भावसार, नीलेश पाटील, सुहास भावसार आदींचा समावेश होता.

शहरातील मुख्य रस्ते सा.बां. विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी जनसुविधा विभागांतर्गत अनुदानही प्राप्त झाले आहे. तथापि कामांना अद्याप प्रारंभ झाला नसल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देवरे यांना निवेदन देत चर्चा केली असून त्यांनी येत्या 15 दिवसात प्रस्तावित कामे हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे.

दिनेश ठाकरे, प्रदेश सचिव रा.काँ.

Related Stories

No stories found.