ॲड. सदावर्ते यांच्या समर्थनार्थ अनवाणी पदयात्रा

ॲड. सदावर्ते यांच्या समर्थनार्थ अनवाणी पदयात्रा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एसटी कामगारांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunratna Sadavarte )यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ नाशिक ते मुंबई मंत्रालयापर्यंत ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके (OBC Suvarnakar Samiti Maharashtra State President Gaju Ghodke )यांनी अनवाणी पदयात्रेस प्रारंभ केला.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ऊन, वारा व पावसाची तमा न ठेवता एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान तसेच महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी धरणे आंदोलन व उपोषण करत होते. त्याचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणामागे ॲड. सदावर्ते असल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी त्यांना सध्या अटक केली आहे.

सरकारच्या निषेधार्थ तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या समर्थनार्थ नाशिक येथून ओबीसी सुवर्णकार समितीचे अध्यक्ष अध्यक्ष गजू घोडके व त्यांच्या साथीदारांनी नाशिक ते मंत्रालय अनवाणी पदयात्रेची सुरुवात केली आहे.यावेळी विजय चौघुले, योगेश चांडोले आदी उपस्थित होते.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी ओबीसी समाजाचे नेतृत्व केल आहे. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढा दिला. सध्या त्यांना अटक करण्यात आली आहे. यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक म्हणून नाशिक ते मंत्रालय असा अणनवाणी पदयात्रा सुरू केली आहे. यास आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचे आम्हाला समाधान आहे.

गजू घोडके, प्रदेशाध्यक्ष,ओबीसी सुवर्णकार समिती,

Related Stories

No stories found.