बार्‍हे - आंबोडे रस्त्याची दुरवस्था; रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

बार्‍हे - आंबोडे रस्त्याची दुरवस्था; रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

ठाणगाव । वार्ताहर | Thangaon

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) बार्‍हे ते आंबोडे सात कि. मी. रस्त्याची अवस्था बिकट (Poor road condition) झाली असून वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे.

अनेक वर्षापासून रस्ता डांबरीकरणाच्या (Road asphalting) प्रतीक्षेत असून उखडलेल्या रस्त्याची अक्षरशः धूळधाण झाली असून वाहनचालक व शेतकरी (farmers) यांच्याकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बार्‍हे ते आंबोडे रस्त्यावर अनेक वर्षापासून डांबरीकरण (Asphalting) झाले नसल्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे (potholes) पडले असून ठिकठिकाणी अक्षरशः नकाशे तयार झाले आहे. धरमपुर (dharampur), नाशिक (nashik), सुरगाणा (surgana), दिंडोरी (dindori) या ठिकाणी जायचे असले तर वाहनचालक व प्रवाशांना याच रस्त्यावरून खडतर प्रवास करून जावे लागते. या रस्त्याने वाहने चालविणे अवघड होत आहे.

दुचाकी चालवितांना देखील चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी बार्‍हे ही एक मोठी बाजारपेठ अजून या ठिकाणी सर्वच विभागाचे कार्यालये असल्याने बार्‍हे विभागाशी 50 ते 60 गावे, खेडे - पाडे जोडली असून दररोज शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार बार्‍हे येथे याच रस्त्यावरून आपला जीव मुठीत धरून प्रवास करत यावे लागते.

या बाऱ्हे ते आंबोडे रस्ता दुरुस्तीबाबत (road repair) बाऱ्हे परिसरातील राजकीय मंडळी व नागरिकांनी अनेक वेळा सबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदने (memorandum) देऊन त्यांच्याकडे या रस्त्याचे अनेक वेळा गार्‍हाणे मांडले, परंतु आजपर्यंत त्याबाबत काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता तरी पुढच्या भविष्याचा विचार करून रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक, शेतकरी यांच्याकडून होत आहे.

धरमपुर, नाशिक, दिंडोरी, सुरगाणा आदी ठिकाणी जायचे असले तर याच रस्त्यावरून जावे लागते. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात चोवीस तास वाहतूक सुरू असते मात्र अरूंद व खोलवर गेलेल्या साईटपट्टयांमुळे रस्ता धोकादायक बनल्यामुळे दोन वाहने एकाचवेळी पास करताना खोल गेलेल्या साईटपट्टयांमुळे अपघात होण्याचे वारंवार घडत आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी व प्रवाशांमध्ये भिती बरोबरच संताप व्यक्त होत आहे.

- संजय पडेर, सामाजिक कार्यकर्ते

बार्‍हे ते आंबोडे सात कि. मी. रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून वाहनधारकांना वाहनचालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खराब रस्त्यामुळे छोट्या - मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. तसेच वाहन पंक्चर होणे, पलटी होणे, पाटे तुटणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रवाशांना शारिरीक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देवून रस्ता त्वरीत दुरुस्ती करावा.

- देविदास कामडी, सामाजिक कार्यकर्ते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com