वकील संघ निवडणुक; 11 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात

वकील संघ निवडणुक; 11 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर (sinnar) वकील संघाच्या (Bar Association) पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी 25 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कार्यकारिणीच्या 18 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. शिवाजीराव देशमुख यांनी दिली

अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. राहुल दराडे यांचा सामना अ‍ॅड. जयसिंह सांगळे यांच्याशी होईल. उपाध्यक्षपदासाठीही अ‍ॅड. श्रीपाद जोशी व अ‍ॅड. रमेश काळे, अ‍ॅड. देवेंद्र खरात, अ‍ॅड. शिवराज नवले व अ‍ॅड. संदीप शेळके यांच्यात चौरंगी लढत होईल. कोषाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. विलास खैरनार, अ‍ॅड. संदेश देशमुख यांच्यात लढत होईल. कार्यकारणी सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत.

त्यात प्रतीक्षा आनप, अनिल उगले, भाग्यश्री ओझा, सुवर्णा काकड, प्रवीण गायकवाड, सचिन घोरपडे, संतोष पवार, असूदीप पाटील, चंद्रशेखर पांगारकर, रोहित लहामगे, प्रदीप वारुंगसे, शंकर शिंदे, शब्बीर शेख, सागर शेळके, चेतन सोनवणे, किरण सांगळे यांचा समावेश आहे.

येत्या बुधवारी (दि.24) सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत मतदान प्रक्रिया (Voting process) न्यायालयातील वकील कक्षात पार पडणार असून दुपारी तीन वाजता त्याच ठिकाणी मतमोजणी (votes counting) करण्यात येईल व निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. सिन्नर वकील संघाचे 155 सभासद या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com